राज्यमंत्री शिवतारे यांचे आश्वासन
नीरा- नीरा नदीला आलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या डोंबारी समाजातील कुटुंबियांना स्थलांतरीत केलेल्या मराठी शाळेत राज्य जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी भेट घेत त्यांची विचारपुस करून अन्नधान्याचे वाटप केले.
राज्यमंत्री शिवतारे म्हणाले की, ग्रामपंचायतीने जागा दिल्यास आपण या बाधित 28 कुटुंबाना 300 स्के.फुटची पक्की घरे बांधून देऊ तसेच या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुचा पुरवठाही करण्यात येईल, असे सांगितले. यावर ग्रामपंचायतीची 7 ते 8 गुंठे जागा उपलब्ध करून देऊ, असे ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी मंत्री शिवतारे यांना सांगितले. यावेळी शिवतारे यांच्या वतीने बाधित कुटूंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य दिलीप यादव, अतुल म्हस्के, अनिल चव्हाण, दयानंद चव्हाण, संजय भंडारी, प्रल्हाद भंडारी, स्वप्निल थोपटे, रवींद्र गायकवाड, युन्नुस बागवान, विश्वजित सोनवणे, गौरव भुजबळ आदी उपस्थित होते.