नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करीत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 2020-2021 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु झाले आहे.
यावेळी शिक्षणाच्या संदर्भात निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘आता ऑनलाईन डिग्री लेव्हल प्रोग्रामचालविण्यात येणार आहे. लवकरच सरकारकडून नवीन शिक्षा योजनेच्या घोषणा करण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक जिह्ल्यातील रुग्णालयात येत्या काळात मेडिकल कॉलेज बनविण्यात येणार आहे. लोकल बॉडीमध्ये काम करण्यासाठी तरुण इंजीनियर्सला इंटरशिप दिली जाणार आहे.
बजट भाषण में वित्त मंत्री निर्मला सीतारमण: शिक्षा क्षेत्र के लिए 99,300 करोड़ का प्रस्ताव। राष्ट्रीय पुलिस विश्वविद्यालय और राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालय का प्रस्ताव। कौशल विकास के लिए 3 हज़ार करोड़ का प्रस्ताव। https://t.co/gKNmQB1V37
— ANI_HindiNews (@AHindinews) February 1, 2020
दरम्यान, उच्च शिक्षणाला उत्तम करण्यासाठी सरकार काम करीत आहे. जगातील विद्यर्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच भारतातील विद्यार्थांना एशिया, अफ्रीकेतील देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुलिस विद्यापीठ, राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विद्यापीठ बनविण्याच्या प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात येणार आहे. डॉक्टरांसाठी ब्रिज प्रोग्राम सुरु करण्यात येणार आहे. या ब्रिज प्रोग्राममुळे शिकाऊ डॉक्टरांना व्यावसायिक बाबींबाबत शिकायला मिळेल. असेही त्यांनी सांगितले.