#अर्थसंकल्प_2020 : जीडीपी ६ ते ६.५ टक्के राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून प्रारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमन २०२०-२१ वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. यानुसार, आगामी आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ६ ते ६.५ टक्के राहील. दरम्यान, २०१९-२०चा विकासदर ५ टक्के राहिला आहे.

– चालू आर्थिक वर्षात कर वसुलीत घट होऊ शकते.

– जीएसटीमुळे सरकारच्या तिजोरीत अधिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. परंतु, त्याबाबत स्पष्टता नाही.

– चालू आर्थिक वर्षात विकास दर पाच टक्क्यांच्या दराने वाढेल.

–  अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आण्यासाठी सरकारला बरीच पावले उचलावी लागतील.

– अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक नियमांना शिथिल करावे लागतील.

– आर्थिक क्षेत्रातील अडचणींमुळे गुंतवणूकीअभावी चालू आर्थिक वर्षातील वाढही कमी झाली आहे.

– केंद्र सरकार २०२० ते २०२५ या आर्थिक वर्षांमध्ये इंफ्रा सेक्टरमध्ये १०२ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

– पुढच्या तीन वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात १.४ ट्रिलीयन डॉलर म्हणजेच १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज आहे, असा सल्लाही या सर्वेमधून देण्यात आला आहे.

– २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने १२० कोटी टन मालाची वाहतून केली. त्याबरोबरच भारतीय रेल्वे जगातील चोथी सर्वात मोठी मालवाहक बनली.

दरम्यान, 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल. दोन टप्प्यांत अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. पहिल्या टप्प्याचे कामकाज 11 फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यानंतर 2 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत अधिवेशनाचा दुसरा टप्पा पार पडेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.