#Budget2019 – काय महाग काय स्वस्त

दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करता सीतारामन यांनी काही गोष्टींवर कर वाढवल्याचे तर काही गोष्टींना करमुक्त केल्याचे जाहीर केले. त्यामुळेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत तर काही महाग.

महाग झालेल्या वस्तू –
* तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सिगरेट.
* पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये प्रती लिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे. प्रती लिटर एक रुपया इन्फ्रास्टक्‍चर सेस आणि एक रुपया अतिरिक्त कर वाढवल्याने पेट्रोल-ड़िझेलची किंमत दोन रुपयांनी वाढणार आहे.
* डिजीटल कॅमेरा
* सोन्यावरील आयात कर 10 टक्क्‌यांवरुन 12.50 टक्के करण्यात आल्याने सोने महागणार.
* काजू.
* पदेशातून येणाऱ्या पुस्तकांवरील कर वाढवल्याने किंमत वाढणार.
* पिव्हीसी पाईप.
* गाड्यांचे सुटे भाग.
* सिंथेटीक रबर.
* ऑप्टीकल फायबर.
* घरांच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या टाइल्स.
*व्हिनएल फ्लोअरिंग.

स्वस्त होणार-
* इलेक्‍ट्रीक कार.
* विमा स्वस्त होणार.
* घरे स्वस्त होणार: भाड्याने घरे घेण्यासंदर्भातील कायद्यामध्ये बदल करणार.

Leave A Reply

Your email address will not be published.