#अर्थसंकल्प2019-20 : रस्ते विकास योजना याविषयीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पातील घोषणा

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (मंगळवार) विधानसभेत वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत राज्यमंत्री दीपक केसरकर हे सन २०१९-२० चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करीत आहेत.

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग याविषयी अपेक्षित खर्च आणि तरतूदीच्या घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2015-16 ते सन 2019-20 या कालावधीकरीता 30 हजार कि.मी. लांबीचे उद्दिष्ट. त्यावर रु. १८ हजार १५० कोटी एवढा खर्च अपेक्षित असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

रस्तेविकासाबाबतच्या महत्वाच्या घोषणा –

राज्यात आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग मिळुन एकुण 2 लाख 99 हजार 446 कि.मी. पेक्षा जास्त लांबीचे रस्ते विकसित. रस्ते विकास योजनेत एकूण 3 लाख 36 हजार 994 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट–वित्तमंत्री

#मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2015-16 ते सन 2019-20 या कालावधीकरीता 30 हजार कि.मी. लांबीचे उद्दिष्ट. त्यावर रु. १८ हजार १५० कोटी एवढा खर्च अपेक्षित-वित्तमंत्री

आतापर्यंत 29 हजार 76 कि.मी. लांबीच्या 7 हजार 284 कामांना प्रशासकीय मंजूरी. त्यापैकी 8 हजार 819 कि.मी. लांबीची कामे पूर्ण. उर्वरित 20 हजार 257 कि.मी. लांबीची कामे प्रगतीपथावर. सदर कामासाठी आशियाई विकास बँकेकडून रु.४ हजार २५४ कोटी एवढे कर्ज उपलब्ध होणार-वित्तमंत्री

नागपूर-मुंबई #समृध्दी महामार्ग 10 जिल्हे 26 तालुके व 390 गावांमधून जाणार असून यावर सुमारे रु.55 हजार 335 कोटी इतका खर्च अपेक्षित. सदर महामार्गाचे काम 1 जानेवारी 2019 रोजी सुरु. बांधकामाचे 16 पॅकेजेसमध्ये नियोजन.14 पॅकेजेसचे कार्यारंभ आदेश. जलदगतीने काम सुरु- वित्तमंत्री

मुंबई-पुणे या दोन मोठया शहरातील प्रवासाच्या वेळेत बचत करण्याकरिता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याचे प्रस्तावित. या प्रकल्पावर रु.6 हजार 695 कोटी इतका खर्च अपेक्षित, काम प्रगतीपथावर-वित्तमंत्री

ठाणे खाडी पूल-3-सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर तिसऱ्या खाडी पुलाचे बांधकाम करण्यासाठी रु.775 कोटी 58 लक्ष इतक्या किंमतीस प्रशासकीय मान्यता.हा प्रकल्प खाजगी सहभागातून. काम प्रगतीपथावर-वित्तमंत्री

वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूची उभारणी व अनुषंगिक कामे सुरु. सदर प्रकल्पाची किंमत रु.11 हजार 332 कोटी 82 लक्ष इतकी. हे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजित असून सदर काम प्रगतीपथावर -वित्तमंत्री

22 कि.मी. लांबीच्या शिवडी न्हावा शेवा-मुंबई पारबंदर या प्रकल्पाची रु.17 हजार 843 कोटी किंमत असून कामास मार्च 2018 पासून सुरुवात.हा प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन-वित्तमंत्री

सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकरिता रु.16 हजार 25 कोटी 50 लक्ष 96 हजार तरतूद प्रस्तावित -वित्तमंत्री

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान या अभियानात आतापर्यंत रु.7 हजार 644 कोटी किंमतीचे 145 पाणीपुरवठा, मलनिस्सारण व रस्तेप्रकल्पांना मान्यता. आतापर्यंत रु.2 हजार 200 कोटी किंमतीचे 40 प्रकल्प पुर्ण करण्यात आले असून उर्वरित प्रकल्प प्रगतीपथावर – वित्तमंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.