मुंबई: आज महाविकास आघाडीने पहिला अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. डिझेल व पेट्रोलवर करवाढ केली. करवाढीच्या माध्यमातूल लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम केले आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा हा अर्थसंकल्प असल्याचे दरेकर म्हणाले.
अर्थसंकल्पात एकही नवीन आदिवासी योजना नाही. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ असूयेपोटी बंद केले. पायाभूत सुविधांबाबत सरकारकडे कोणत्याही संवेदना नाहीत. कोकणातील काज व फळ प्रक्रियेला केवळ 15 कोटी रुपये दिले आहेत. नागरी तसेच ग्रामीण सडक योजना व मेट्रोसाठी अपुऱ्या तरतुदी केल्या आहे. पुरेशी आर्थिक तरतूद नसलेला अर्थसंकल्प आहे. धनगर समाजालासुद्धा केराची टोपली दाखवण्यात आली आहे. पुढाऱ्यांपुरता हा अर्थसंकल्प आहे. भुलभुलैया करणार अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली