Union Budget 2026–27: या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बनविण्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर अर्थ मंत्रालयात हलवा तयार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मंगळवारी या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहभाग नोंदविला. अर्थ मंत्रालयाचे कार्यालय सध्या कर्तव्य भवन येथील नव्या वास्तुत स्थलांतरित झाले आहे. मात्र हलवा कार्यक्रम जुन्या कार्यालयात म्हणजे नॉर्थ ब्लॉक येथील अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात पार पडला. याच ठिकाणी अर्थसंकल्पाची छपाई पूर्ण झाली आहे. अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर अर्थ मंत्रालयातील सर्व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. अर्थसंकल्प रविवार 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. त्या अगोदर एक दिवस आर्थिक सर्वेक्षण जाहीर होणार आहे. आर्थिक सर्वेक्षण अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार तयार करीत असतात. जागतिक व्यापार युद्ध आणि भूराजकीय तणामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती खराब आहे. जागतिक विकास दर कमी होणार आहे. मात्र तरीही यावर्षी भारताचा विकासदर 7.6 टक्के होणार आहे. सलग नवव्या वेळा सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अर्थसंकल्प डिजिटली सर्वांना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी छापलेल्या प्रति पाहण्याची गरज भासणार नाही. 1950 अगोदर अर्थसंकल्प राष्ट्रपती भवनात छापला जात होता. एका वर्षी या अर्थसंकल्पातील माहिती लिक झाली. त्यानंतर अर्थसंकल्पाची छपाई मिंटो रोड येथे करण्यात येत होती. नंतर ही छपाई नॉर्थ ब्लॉक मधील अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात हलविण्यात आली होती. अर्थसंकल्प वाचून पूर्ण झाल्यानंतर तो लगेच अर्थसंकल्पाच्या वेबसाईटवर आणि मोबाईल अॅपवर उपलब्ध होणार आहे. नॉर्थ ब्लॉक मधील या कार्यालयात 40 वर्षापासून म्हणजे 1980 पासून 2020 पर्यंत प्रत्यक्ष कागदपत्राची छपाई केली जात होती. मात्र दोन 2020 पासून ही छपाई कमी झाली आहे आणि डिजिटल स्वरूपात अर्थसंकल्प जास्त प्रमाणात पाहिला जात आहे. स्वतः सिताराम टॅबमधून अर्थसंकल्पाचे वाचन करीत असतात. पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी आल्यानंतर म्हणजे 2014 नंतर अर्थसंकल्पात बरेच बदल करण्यात आले आहेत. अगोदर अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प वेगळे जाहीर केले जात होते. आता दोन्ही बाबी एकत्र करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अगोदर अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येत होता. तो आता एक फेब्रुवारी रोजी जाहीर केला जात आहे. विशेष म्हणजे एक फेब्रुवारी रोजी यावर्षी रविवार असूनही या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही. रविवारी शेअर बाजाराचे कामकाजही चालू राहणार आहे