नवी दिल्ली – केंद्रीय अंदाज पत्रकात मोबाइल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे. मोबाइल फोन चार्जरचा ट्रान्सफार्मर आणि कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क घटवण्यात आले आहे. त्यामुळे मोबाइल फोन चार्जर स्वस्त होणार आहेत. देशात निर्माण होणारे मोबाइलही स्वस्त होणार आहेत.
कस्टम ड्युटी घटवली
या शिवाय अर्थमंत्री सीतारामन यांनी काही केमिकल्सवरील कस्टम ड्युटी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मिथेनॉलचा समावेश आहे. देशांतर्गत मॅन्यूफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्टिल स्क्रॅपवरील कस्टम ड्युटीवरही सूट एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. तसेच जेम्स अँड ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी 5 टक्क्यांनी घटवण्यात आली आहे. त्यामुळे जेम्स अँड ज्वेलरी स्वस्तात मिळणार आहेत.