पुणे – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. आता पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागणार आहे.पेट्रोलवर 2.50 कृषी अधिभार तर डिझेलवर 4 रुपयांचा कृषी अधिभार लागणार आहे. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील अलका टॉकिज जवळ ( टिळक चौक)तीव्र निदर्शने केले.
दरम्यान, डिझेलवर 4 रूपयांचा कृषी अधिभार आणि पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी अधिभार लावण्यात आल्यानं पेट्रोल लवकरच शंभरी पार करु शकते. जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी थेट कृषी अधिभाराचा परिणाम पेट्रोल डिझेल किमतींवर होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.