नवी दिल्ली – देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होंणाऱ्या वाढीमुळे देशभर असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असताना केंद्र सरकारने पुन्हा या अर्थसंकल्पाद्वारे इंधन दरवाढ केली आहे.
आता पेट्रोल मध्ये प्रति लिटर अडीच रूपये आणि डिझेल मध्ये प्रतिलिटीर चार रूपये इतका कृषी विकास सेस लागू केला आहे.
तथापी याचा नागरीकांवर थेट भार पडणार नाहीं याची दक्षता सरकारने घेतली असून इंधनावर जे बेसिक उत्पादन शुल्क किंवा विषेश अतिरीक्त उत्पादन शुल्क लागू आहे त्यात सवलत देऊन हा नवीन सेस लागू करण्यात येणार आहे त्यामुळे ग्राहकांना त्याचा बोजा सहन करावा लागणार नाही असे अर्थमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
कृषी क्षेत्रातील सुविधांसाठी जो जादाचा खर्च केला जाणार आहे तो या तरतूदीद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे.