#Budget 2019: शेतकरी, कामगार आणि नोकरदारांना खूष करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली: हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी नवीन आर्थिक वर्षाचा अंतरीम अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार आणि नोकरदारांना खूष करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये थेट त्यांच्या बॅंक खात्यांवर मदत म्हणून जमा करण्याचा महत्वपुर्ण निर्णय सरकारने घेतला असून असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी मासिक तीन हजार रूपये पेन्शन देण्याची नवीन योजना सरकारने सुरू केली आहे.

मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. या आधी अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते त्याची मर्यादा थेट दुपटीने वाढवण्यात आल्याने मध्यम वर्गासाठी ही खूषखबर ठरली आहे. या अंतरीम अर्थसंकल्पात सरकारने नागरीकांवर कोणताही नवीन कर भार टाकण्याचे टाळले असून रेल्वेतही कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. गोसंवर्धनासाठी साडे सातशे कोटींची कामधेनू योजना, बाळंतपणासाठी महिलांना 26 महिन्यांसाठी पगारी सुट्टी, अशा काही महत्वपुर्ण घोषणांचाही या अर्थसंकल्पात समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारने या अर्थसंकल्पात दिलेल्या आयकर सवलतीचा सुमारे तीन कोटी करदात्यांना लाभ होईल तर असंघटीत क्षेत्रातील पेन्शन योजनेचा दहा कोटी कामगारांना लाभ घेता येईल. सरकारने दोन हेक्‍टर म्हणजेच सुमारे पाच एकर पर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रूपये या प्रमाणे वार्षिक सहा हजार कोटी रूपयांची मदत देण्याची जी योजना जाहीर केली आहे त्याचा एकूण 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल असा अंदाज आहे. देशातील बदलाला आणि विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प ठरेल असा विश्‍वास पियुष गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)