लखनौ – बलात्काराच्या आरोपानंतर फरार झालेले बसपाचे खासदार अतुल राय यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. त्यानंतर राय यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. अतुल राय हे घोसी मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत.
निवडणुकीच्या प्रचारावेळी एका विद्यार्थिनीने अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. त्यानंतर मायावती व अखिलेश यादव यांनी त्यांचा प्रचार केला होता.