नेवासा : नेवासा फाटा येथे तब्बल 15 तास बीएसएनएल कंपनीची भ्रमनध्वनी सेवा बंद पडल्यामुळे अनेकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात असून वारंवार ही सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे अनेकांवर पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. याबाबत भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे बीएसएनएल कार्डधारक मंडळी आता प्रचंड वैतागली असल्याचे दिसून येत आहे.
नेवासा फाटा येथे बीएसएनएल कंपनीचे टॉवर असून अनेकदा येथे तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे मोबाईल धारकांना सेवा व्यवस्थित मिळत नसल्याचा स्पष्ट आरोप बीएसएनएल कंपनीच्या ग्राहकांतून उपस्थित केला जात आहे. मंगळवारी रात्री बारा वाजता मोबाईलधारकांची रेंज गुल झाल्यानंतर थेट बुधवारी दुपारी 3 वाजता ही सेवा तब्बल 15 तासांच्या विश्रांतीनंतर चालू झाली असल्यामुळे अनेकांचे प्रचंड कामे खोळंबून पडलेली होती. ग्राहकांना ही सेवा सुरुळीत सुरु करुन द्यावी अन्यथा वेगळा विचार करु ? असा गर्भित इशारा मोबाईल धारकांकडून दिला जात आहे.
15 तास बीएसएनएलची रेंज गुल
नेवासा फाटा येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तब्बल १५ तासानंतर बीएसएनएलच्या ग्राहकांना अखेर रेंज मिळाली असून अनेकांची कामे मोबाईलला रेंज नसल्यामुळे अडकून पडलेली असल्यामुळे लोकांकडून कंपनीच्या लहरी कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.