बीएसएनएलला सरकारकडून मदत मिळण्याची शक्‍यता

पुणे – महसूल आणि उत्पन्नातील तफावतीमुळे बीएसएनएल कंपनी बरीच अडचणीत आली आहे. मात्र, यातून बाहेर पडण्यासाठी बीएसएनएलने सरकारकडे पॅकेजची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार सरकार काही प्रमाणात बीएसएनएलला या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करणार आहे. सरकारने बीएसएनएलकडून सध्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती मागविली आहे. त्याचबरोबर कोणत्या उपाययोजना केल्यानंतर हे प्रश्‍न सुटतील याचा आराखडा मागितला आहे. त्यानंतर कशा स्वरुपाचे पॅकेज आवश्‍यक आहे, याची माहिती बीएसएनएलच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारला दिलेली आहे. दूरसंचार मंत्रालयात यावर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच बीएसएनएलला मदत मिळण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.