पंजाबच्या सीमेवर पाकचे ३ संशयित ड्रोन आढळले, बीएसएफकडून गोळीबार

नवी दिल्ली – पाकच्या भारताविरोधातील कुरापती अजूनही सुरूच आहेत. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. यातच आता पंजाबमधील हुसैनीवाला सेक्टरमध्ये तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना भारत-पाकिस्तान सीमेवर 3 ड्रोन आढळून आले आहेत. यासंबंधीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तानकडून येणारे संशयित ड्रोन्स पाहिले. त्यानंतर जवानांनी यावर गोळीबार सुद्धा केला.या महिन्याच्या सुरुवातीला येथील राम लाल, टेंडीवाला आणि हजारा सिंहवाला गावातील लोकांनी ड्रोन पाहिले होते. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना अलर्ट करण्यात आले होते. तेव्हापासून सीमा सुरक्षा दवाचे जवान आणि पंजाब पोलीसांनी शोध मोहीम राबविली होती. मात्र, यावेळी काही यासंबंधी संशयीत असे काही आढळून आले नाही. त्यावेळी सीमेवरील गावातील लोकांना असे सूचित करण्यात आले होते की, कोणतीही संशयित वस्तू दिसल्यास लगेच पोलीस किंवा सीमा सुरक्षा जवानांना कळवण्यात यावे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.