गांधीनगर – गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात अरबी समुद्राजवळ बीएसएफ जवानांनी पाकिस्तानी बोट ताब्यात घेतली आहे. मात्र, बोटीतील मच्छिमार दुसऱ्या बोटीतून पाकिस्तानच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. बीएसएफने सांगितले की, पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत सुमारे 100 मीटर आत दिसली, त्यानंतर ती जप्त करण्यात आली. या बोटीमध्ये मासेमारीची जाळी आणि इतर उपकरणांशिवाय काहीही संशयास्पद आढळले नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास बीएसएफचे एक पथक गस्तीवर होते. यादरम्यान दोन पाकिस्तानी बोटी भारतीय हद्दीत शिरताना दिसल्या. यानंतर बीएसएफचे गस्ती पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि एक पाकिस्तानी मासेमारी बोट जप्त करण्यात आली.