बीएसएफ जवानांचा एकमेकांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू

आगरतळा  – त्रिपुरामध्ये बांगलादेश सीमेजवळ तैनात असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांमधील भांडणाला दुर्दैवी वळण मिळाले. जवानांनी एकमेकांवर केलेल्या गोळीबारात दोघांना प्राण गमवावे लागले. त्याशिवाय, बीएसएफचा एक अधिकारी जखमी झाला.

त्रिपुरामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत बीएसएफचे ठाणे आहे. तिथे तैनात असणाऱ्या प्रताप सिंह आणि सतबीर सिंह या जवानांमध्ये कुठल्याशा कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी प्रताप यांनी केलेल्या गोळीबारात सतबीर यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रताप यांच्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक राम कुमार हेही जखमी झाले. प्रताप यांना रोखण्यासाठी एका जवानाने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामध्ये प्रताप यांनीही जीव गमावला. बीएसएफने संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय, स्थानिक पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.