पंढरपूर – शहरातील संत गजानन महाराज मठामागे असलेल्या लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या एका मुलाने आपल्या सावत्र आईची धारदार शस्त्राचा वापर करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी लक्ष्मीनगर येथे राहणारी प्रभावती कदम हिचा सावत्र मुलगा संजय कदम हा रिक्षाचालक आहे. तो सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या सावत्र आईकडे आला असता अज्ञात कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यानंतर त्याने धारदार शस्त्राने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच मयत महीलेच्या पतीचे निधन झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. सदर घटनेचे कारण अस्पष्ट असून या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
–