#व्हिडिओ: माता तू न वैरीण; महिलेची चिमुरडीला अमानुष मारहाण

पुणे: आई म्हटलं की प्रेम त्याग काळजी या सगळ्या बाबी आपल्या नजरेसमोर येतात. परंतु एखादी महिला जर ७ ८ वर्षाच्या चिमुरड्या लेकराला जनावराप्रमाणे वागणूक देत अमानुष मारहान करत असेल तर, तिला काय म्हणावं? असा प्रश्न पडतो. असाच एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर “माता न तू वैरीण” असं म्हणण्याची वेळ येत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला या लहान मुलीला अशी अमानुष मारहाण करत आहे, की ते बघणाऱ्याच्या अंगावर शहरे येतात. हि महिला त्या मुलीला मारहाण करतानाच व्हिडिओ शेजाऱ्यांनी गुपचूप रेकॉर्ड केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हि महिला त्यामुलीला मारहाण करत असतानां शेजारील घरामधील लोक लांबून हा सर्व प्रकार पाहत आहेत. परंतु कोणाचीही समोर येऊन त्या मुलीला वाचवण्याची हिम्मत होत नाही. त्यातूनच हि माहिती किती क्रूर असेल याची कल्पना येते.

दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे याची कुठलीही माहिती समोर आलेली नाही. परंतु या घटनेचा शोध घेऊन या निर्दयी महिलेवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.