संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती पक्षाला अर्थात बीआरएसला अखेर राज्यात पहिले यश मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी झालेल्या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज आला असून, गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचे उमेदवार विजयी झाला आहे.
गफार सरदार पठाण असे बीआरएसच्या विजयी उमेदवाराचे नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली होती. बीआरएस पक्षाला राष्ट्रीय स्थरावर वाढवण्यासाठी के.चंद्रशेखर राव यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सभा देखील घेतल्या आहे.
तर आगामी सर्वच निवडणुका लढवणार असल्याचं निर्णय देखील या पक्षाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ग्रामपंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत देखील बीआरएस पक्षाचे कार्यकर्ते रिंगणात उतरले होते. तर काल झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे आज निकाल हाती आला असून, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचं उमेदवार विजयी झाला आहे.
गफार सरदार पठाण असे बीआरएसच्या विजयी उमेदवाराचं नाव आहे. विशेष म्हणजे राज्यातील बीआरएस पक्षाचा हा पहिला विजय असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.