मुंबई – बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने त्याच्या करियरमधील सर्वांत मोठा ब्रेक घेतला आहे. याबाबत खुद्द सलमानने खुलासा करत सांगितले की, मागील 30 वर्षांच्या कारकिर्दीत मी आजपर्यत एवढा मोठा ब्रेक कधीही घेतला नव्हता.
पण करोनाच्या महामारीत करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मला ब्रेक घ्यावा लागला. “बिग बॉस-14’च्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत सलमाने हा खुलासा केला आहे. सलमान हा 3 ऑक्टोबरपासून “बिग बॉस’च्या आगामी सीजनचे होस्ट करणार आहे. सलमान म्हणाला, गेल्या सहा महिन्यांत काम न करणे माझ्यासाठी खूपच तणावपूर्ण राहिले आहे. मी गेल्या 30 वर्षांतही अशी सुट्टी घेतलेली नव्हती.
View this post on Instagram
यातच भाईजान लॉकडाऊननंतर सात महिन्यांनी आगामी सिनेमा ‘राधे’च्या शूटिंग सुरुवात करणार आहे. सलमान खान 2 ऑक्टोबरपासून एनडी स्टुडिओमध्ये राधेचे शूटिंग सुरु करतो आहे. 15 दिवसांच्या शूटिंगनंतर फायनल पॅचअप वर्क महबूब स्टुडिओमध्ये करण्यात येईल. या दरम्यान यावेळी कोरोना व्हायरसला लक्षात घेऊन सेटवर विशेष व्यवस्था केली जाईल.
मुबईबाहेरील शूटिंग दरम्यान दिवसाचा प्रवास टाळण्यासाठी, प्रॉडक्शन टीमने एनडी स्टुडिओ जवळ एक हॉटेल बुक केले आहे जिथे सर्व तंत्रज्ञ राहतील. शूट दरम्यान त्यांना बाहेरच्यांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व क्रू ची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. सगळ्यांचे रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहे.
लवकरच दुसरी टेस्ट करण्यात येणार आहे ज्यात कलाकार आणि कोर टीमचा समावेश असेल. गाईडलाईन्स नुसार, टीमला वापरलेले पीपीए किट आणि मास्क फेकून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा प्रभुदेवा दिग्दर्शित करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.