बॉलीवूडमधील भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याने रविवारी एक पोस्ट करत “राधे ः यॉर मोस्ट वांटेड भाई’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याची माहिती दिली. सलमानने मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वीच दिग्दर्शक प्रभू देवाच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. भाईजानच्या या चित्रपटाची चाहते खूप आतुरतेने वाट पाहत आहे.
सलमानने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो ब्लॅक जॅकेट घालून कॅमेऱ्यासमोर पाठमोरा उभा आहे. या फोटोसह त्याने पोस्ट केले की, साडेसहा महिन्यांनंतर शूटिंगवर परतलो आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 22 मे रोजी रिलीज होणार आहे. यात सलमानसोबत दिशा पाटनी झळकणार आहे.
या चित्रपटातील दोन गाणे आणि सुमारे पाच दिवसांचे शूटिंग बाकी आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात संपूर्ण टीमसाठी स्टूडियोच्या जवळील एक हॉटेल बुक करण्यात आले आहे. तसेच सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून टीममधील कोणत्याही सदस्याला बाहेरील व्यक्तीला भेटण्यास अनुमती देण्यात आलेली नाही. याशिवाय सेटवर एका डॉक्टरासह एक विशेष पथक नेमण्यात आले आहे.