Entertainment । या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये उत्कंठा वाढणार आहे कारण स्पर्धक ‘थिएटर राऊंड’ मध्ये उत्तम परफॉर्म करून आपली पुढील वाटचाल सुनिश्चित करणार आहेत. परीक्षक विशाल ददलानी, श्रेया घोषाल आणि अतिथी परीक्षक नीती मोहन यांच्या पसंतीस उतरण्यासाठी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी स्पर्धक आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. टॉप 15 मध्ये स्थान मिळवण्यासाठी होणार स्पर्धकांमध्ये चुरस. या थिएटर राऊंडमध्ये अशीच एक जोरदार टक्कर देताना दिसतील ‘आयडॉल का फीलवाला परफॉर्मर’ – प्रियांशु आणि ‘आयडॉल की लूपवाली आवाज’- विश्वरूप.
प्रियांशुच्या गाण्यात स्टाइलिश स्पर्श होता. ऑडिशन फेरीत बादशाहने त्याला कौतुकाने दिलेले जॅकेट परिधान करून तो मंचावर येईल. परीक्षक श्रेया घोषाल आणि विशाल यांनी त्यांच्या अनोख्या स्टाइलचे कौतुक करून असे नमूद करतील की कदाचित ऑडिशन फेरीत तीन ‘गोल्डन माइक’ पटकावणारा तो एकमेव स्पर्धक असेल. प्रियांशुने सांगितले की त्याचा रूममेट विश्वरूप याच्याशी त्याचे घट्ट नाते जुळले आहे आणि तो अप्रशिक्षित गायक असल्यामुळे विश्वरूप त्याचा गुरु बनून त्याला कसे धडे देतो.
त्या दोघांच्या नात्याविषयी नीती मोहन म्हणाली, “विश्वरूप, प्रियांशु तुझे कौतुक करत होता की त्याला इतक्या कमी अवधीत तुझ्या रूपाने कसा एक भाऊ मिळाला आहे. हे खरोखर कौतुकास्पद आहे.”
प्रियांशु आणि विश्वरूपने ‘तडप तडप’ आणि ‘सतरंगी रे’ ही गीते सादर करताना त्यात जीव ओतला. त्याबद्दल त्यांना परीक्षकांकडून खूप प्रोत्साहक दाद मिळाली. परीक्षकांमध्ये तर त्या दोघांना प्रतिष्ठित ‘प्लॅटिनम माइक’ द्यावा का याबाबत चर्चा देखील झाली कारण दोघांनी उत्कृष्ट परफॉर्म केले. या रोमांचात भर घालत, बादशाहने व्हिडिओ कॉल करून सगळ्यांना सर्प्राइज दिले. त्या दोघांना शुभेच्छा देऊन त्याने त्यांचे मनोबल वाढवले.
प्रियांशुच्या निखळ आणि भावुक करणाऱ्या परफॉर्मन्सला नीती मोहनने स्टँडिंग ओव्हेशन दिले. ती म्हणाली, “तुझे गाण्यावर जे प्रेम आहे, ते प्रत्येक सुरा-सुरातून दिसते.” त्याला पुस्ती जोडत श्रेया घोषाल म्हणाली, “आज संगीत केंद्रस्थानी होते आणि तुझा भावनिक आवेग ही तर तुझी खास शैली झाली आहे.”
विश्वरूपच्या परफॉर्मन्सने सगळे परीक्षक भलतेच प्रभावित झाले. श्रेया म्हणाली, “तुझ्या आवाजात वेदना आणि प्रेम दोन्ही आहे. ज्यामधून एक अविस्मरणीय अनुभव तयार होतो.” त्या दोन्ही गायकांच्या निष्ठेचे कौतुक करत विशाल ददलानी म्हणाला, “तुम्ही दोघे खरे संगीत प्रेमी आहात, संगीताला तुम्ही आपले सर्वस्व देता.”
आपल्या दमदार परफॉरमन्सने आणि परस्परांतील सख्याने प्रियांशु आणि विश्वरूप यांनी थिएटर राऊंडमध्ये एक उंच मापदंड स्थापित केला आहे. ते दोघे प्लॅटिनम माईकवर दावा करून टॉप 15 मध्ये आपले स्थान सुनिश्चित करू शकतील का?
अवश्य बघा, इंडियन आयडॉल सीझन 15 मधील थिएटर राऊंड या शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर