मुंबई – 12 फेब्रुवारीला बिग बॉसच्या विजेत्याची घोषणा झाली तेव्हा एक नाव ऐकून सर्वांनाच धक्का बसला. प्रियंका चहर चौधरी किंवा शिव ठाकरे विजेते ठरतील असे चाहते गृहीत धरत होते. मात्र सलमान खानने एमसी स्टेनचे नाव घेताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, आता बिग बॉस’च्या या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर उपविजेता असलेला “शिव ठाकरे’ याने स्वतःसाठी एक नवीन कोरी गाडी विकत घेतली आहे.
बिग बॉसमुळे शिव ठाकरेला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. शिवने घेतलेली टाटा कंपनीची ‘हॅरीयर’ गाडी असून याची किंमत अंदाजे 25 लाख रुपये आहे. या आलीशान गाडीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की शिव आपल्या गाडीचा कव्हर काढतो, गाडीच्या पाया पडतो. प्रेमाने गाडीचे चुंबन घेतो. प्रत्येकाला आपली गाडी किती महत्वाची आणि जिव्हाळ्याची असते हे शिवच्या व्हिडिओतून दिसते.
View this post on Instagram
सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, फॅन्स देखील यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत. त्याचा हा प्रवास पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. एका चाहत्यानं कॉमेन्टमध्ये लिहिलं आहे की, ‘शिव, भावा तुझी मेहतन फळाला आली. देवाचा आशिर्वाद तुझ्यावर कायम राहो…’ अश्या अनेक कमेंट फॅन्स करत आहेत.
दरम्यान, मराठमोळ्या शिवने ‘बिग बॉस हिंदी’मधील सदस्यांसह प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली आहे. टास्कविषयी असो, घरात होणार्या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्या नात्यांविषयीची असो. मराठमोळा शिव ठाकरे या यादीत नंबर वन राहिला होता.