मुंबई – सध्या सलमान खान आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसह पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे. तेथूनच त्याने 3 गाणी देखील रिलीज केली आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या फार्महाऊसचे काही व्हिडीओ देखील शेयर केले आहेत.
दरम्यान, आज पुन्हा एकदा सलमानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये सलमानचा अनोखा अंदाज दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान ट्रॅक्टरने शेत नांगरताना दिसत आहे.
पहिले ट्रॅक्टरच्या मागे नांगर लावून सलमान शेतात नांगरणी करताना दिसत आहे. त्यानंतर तो स्वत: ट्रॅक्टरही चालवत आहे. हा व्हिडीओ सलमान खानने ‘फार्मिंग’, असे कॅप्शन लिहून शेअर केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला होता. त्यात सलमान चिखलात माखलेला दिसत होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सलमानने “सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करा…” असं लिहिले होत.
View this post on Instagram
Daane daane pe likha hota hai khane wale Ka naam… jai jawan ! jai kissan !