सातारा ( प्रतिनिधी) – सातारा शहरालगत असलेल्या संगम माहुली येथे भावाने बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे समोर आली. शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेण्यार आले आहे.
दरम्यान, खुनाचे नेमके कारण समजू शकले नसले तरी भावानेच बहिणीचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. वंदना शिंदे (वय अंदाजे 40) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून नंदकुमार माने (वय 50) असे संशयितांचे नाव आहे. दोघे नात्याने भाऊ व बहीण आहेत. पोलिसांनी
घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. धारधार चाकू सारख्या हत्याराने खून केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अधिक तपास सुरू आहे.