Corona : ऑक्सिजनअभावी बहिणीचा मृत्यू; भावाने उभारलं ३० ऑक्सिजनबेडच कोविड सेंटर

पाटणा – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेने अनेकांना प्राण गमवावा लागत आहे. बिहारमधील स्थिती अत्यंत गंभीर असून अनेकांना बेडसाठी भटकंती करावी लागत आहे. बेगुसराई येथील एका तरुणाच्या करोनाग्रस्त बहिणीचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. त्यानंतर भावाने ऑक्सिजनअभावी इतर कोणाचा जीव जाऊ नये यासाठी आपल्या शाळेचे कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरित केले. जिथे ऑक्सिजनयुक्त ३० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

बेगुसराईच्या दून शाळेचे व्यवस्थापक पंकज कुमारच्या बहिणीला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे पंकज कुमारने बहिणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण हॉस्पिटमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याने २७ एप्रिलला पंकजच्या बहिणीचा मृत्यू झाला. याचा पंकजला मोठा धक्का बसला होता.

दरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं पुन्हा कोणाचाही जीव जावू नये यासाठी पंकजने मोठं पाऊल उचललं. त्याने करोना काळात बंद असलेल्या शाळेच रुपांतर कोविड सेंटरमध्ये केलं. येथे ३० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली. शाळेच्या प्रशासनाने याला मिनी रुग्णालय घोषित करून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.