बसस्थानक इमारतीत तुटलेल्या खुर्च्या, कपाटे

पुणे – पुणे स्टेशन बसस्थानकाचा प्रशासकीय विभाग समस्यांच्या विळख्यात आहे. या ठिकाणी कर्मचारी व अधिकाऱ्यांना बसण्यासाठी अपुरी जागा आहे. तसेच, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अस्ताव्यस्त साहित्य टाकण्यात आल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. पुणे स्टेशन बसस्थानकावरून राज्यातील विविध ठिकाणी बस सुटतात. यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, स्थानकातील अनेक कर्मचारी समस्यांनी ग्रासलेले आहेत. या ठिकाणच्या मध्यवर्ती बसस्थानकातील प्रशासकीय विभागातील इमारतीत जागा मोठी आहे. मात्र, इतर साहित्य अस्ताव्यस्त टाकल्याने अधिकारी व कर्मचारी अपुऱ्या जागेत काम करत आहेत. तसेच, या ठिकाणी शौचालय व इतर सोई-सुविधांची दुरवस्था झाली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
बसस्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या हॉलमध्ये तुटलेल्या खुर्च्या, कपाटे, लोखंडी टेबल ठेवले आहेत. त्यासमोर अधिकारी व कर्मचारी बसतात. अस्ताव्यस्त पडलेल्या राडारोड्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×