ग्रॅमी ऍवार्ड विजेती, गायिका ब्रिटनी स्पीयर्स काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाइफमुळेचर्चेत आली आहे. ती आपल्या वडिलांविरोधातील कायदेशीर प्रकरणाची खूपच चर्चा झाली. त्यातच ब्रिटनीने आपला बॉयफ्रेंड सॅम असगरीसोबत साखरपुडा केला असल्याचे जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
ब्रिटनी स्पीयर्स 12 जून रोजी दीर्घकाळापासून बॉयफ्रेंड असलेल्या सॅम असगरीसोबत साखरपुडा केला होता. याबाबत ब्रिटनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे चाहत्यांना माहिती दिली होती. मात्र, यानंतर ब्रिटनीने आपले इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले. ब्रिटनी स्पीयर्सने इन्स्टाग्रामवरून अचानक एक्झिट घेतल्याने तिचे चाहते हैराण होते. तिने असे का केले असावे, याबद्दल त्यांच्यात संभ्रम होता.
याबाबत आता खुद्द तिनेच खुलासा केला आहे. ब्रिटनीने हा निर्णय कोणत्याही अडचणीमुळे नव्हे, तर आपला साखरपुडा सेलीब्रेट करण्यासाठी सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. ब्रिटनीने एक ट्वीट केले की, आपण सर्वजण परेशान असाल. मी फक्त सोशल मीडियावरून एक छोटासा ब्रेक घेतला आहे, तोही आपला साखरपुडा सेलिब्रेट करण्यासाठी मी लवकरच परत येणार आहे, असे तिने म्हटले आहे.