ब्रिटनच्या राजघराण्यामध्ये पडणार फूट; विल्यम्स आणि हॅरी यांचे मार्ग होणार वेगळे

लंडन – ब्रिटनचे युवराज विल्यम्स आणि राजपुत्र हॅरी यांनी आता आपले स्वतंत्र मार्ग निवडण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत एकमेकांच्या अगदी निकटचे असणाऱ्या या युवराजांमध्ये आता फूट पडली आहे. या दोघांनीही आपापले समाजकार्य आणि राजघराण्याबाबतची कर्तव्ये याबाबत अधिक स्वायत्तपणे निर्णय घेण्याचे ठरवले आहे. या दोन्ही भाऊ आणि त्यांच्या जोडीदारांच्या मतांमध्ये भेद आढळल्यामुळे त्यांच्या कर्मचारीवर्गालाही कामावरचा ताण निघून जाणार आहे. स्टाफला आता कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रीत करता येऊ शकणार आहे.

ब्रिटनच्या युवराज्ञी, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची नातवंडे यांना आता युवराज हॅरी यांच्या प्रथम अपत्याच्या जन्मापूर्वीच स्वतंत्र कोर्ट मिळण्याचीही अपेक्षा आहे. हॅरी एप्रिल किंवा मे महिन्यात पिता बनण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत गेल्या 10 वर्षांपासून विल्यम्स आणि हॅरी हे राजघराण्याच्या रिवाजाला अनुसरून कामकाज करत होते.

मात्र आता त्यांच्या भूमिका बदलल्या असणार आहेत. आता दोन्ही भावांचे स्टाफ, कामकाजाचे निर्देश आणि सामाजिक कामातील उद्दिष्टेही स्वतंत्र असणार आहेत. आता विभाजनानंतर विल्यम्स यांच्यावर राजे चार्ल्स यांच्यानंतरचे उत्तराधिकारी म्हणून अतिरिक्‍त जबाबदाऱ्या असणार आहेत. विल्यम्स आणि हॅरी यांच्या कर्मचाऱ्यांची विभागणी हीच या विभाजनाची मुख्य अट असेल. राजे चार्ल्स यांनी या दोन्ही भावांमधील विभाजन सौम्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

हॅरी आणि त्यांची गर्भवती पत्नी मेघन हे किंग्स्टन राजवाड्यातून बाहेर पडून फ्रोग्मोर कोटॅज येथे रहायला जातील. त्यांचे कार्यालय मात्र किंग्जस्टन पॅलेसमध्येच असेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.