ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाकडून नेता निवडीला वेग

लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यामुळे आता हुजूर पक्षाकडून नवीन नेता निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

“ब्रेक्‍झिट’ करार तडीस नेण्याबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांकडून अपेक्षित समर्थन मिळवण्यात थेरेसा मे यांना अपयश आले. याशिवाय मजूर पक्षाकडूनही मे यांच्या “ब्रेक्‍झिट’ प्रस्तावाला जोरदार विरोध व्हायला लागल्यामुळे मे यांनी 7 जून रोजी हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती.

आपण “ब्रेक्‍झिट’ कराराबाबत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आपल्याला यश आले नाही. त्याचा आपल्याला खेद होत असल्याचे मे म्हणाल्या होत्या. हुजूर पक्षाच्या नेते पदासाठी आतापर्यंत 5 उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. नवीन पंतप्रधानांच्या निवडीची प्रक्रिया पुढील दोन आठवडे चालण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.