ब्रिटीश पंतप्रधानांनी दिला पक्ष नेतेपदाचा राजीनामा

लंडन: ब्रिटीश पंतप्रधान थरेसा मे यांनी कॉन्झरव्हेटीव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी त्यांनी या पदाचा औपचारीक राजीनामा दिल्यानंतर आता नवीन पंतप्रधान निवडीची औपचारीक प्रक्रिया तेथे सुरू झाली आहे. ब्रेक्‍झिट संबंधातील आपल्या आश्‍वासनाची पुतर्ता करण्यात अपयश आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

तीन वर्षांपुर्वी म्हणजे सन 2016 मध्ये थेरेसा मे यांनी ब्रिटीश पंतप्रधानपद स्वीकारले होते. पण त्यांना युरोपियन समुदायातून ब्रिटनला बाहेर काढण्यात यश न आल्याने त्यांनी गेल्याच महिन्यात पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची
घोषणा केली होती. ब्रिटन मध्ये युरोपियन समुदायातून बाहेर पडायचे की नाहीं यावरून सध्या दोन गट पडले आहेत. लोकमानसही द्विधा अवस्थेत आहे असे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांच्या जागी येणाऱ्या नवीन पंतप्रधानांना या पेच प्रसंगावर तोडगा काढणे हे मुख्य आव्हान असणार आहे. त्यासाठी त्यांनाही कमी अवधी मिळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.