थेरेसा मे यांच्यकडून ब्रिटीश खासदारांची मनधरणी

“ब्रेक्‍झिट’च्या आराखड्याला मंजूरीसाठी पुन्हा मोर्चेबांधणी

लंडन – सुधारीत “ब्रेक्‍झिट’ योजनेला मंजूरी मिळावी यासाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी बुधवारी ब्रिटनच्या संसदेतील खासदारांची पुन्हा एकदा मनधरणी केली. “ब्रेक्‍झिट’ला अनुकूल हुजूर पक्ष आणि विरोधी पक्षांनी मिळून गेल्या कित्येक महिन्यांपासून ब्रिटनच्या संसदेमधील राजकीय कोंडीला समाप्त करण्यासाठी तडजोडीच्या आवाहनाला धुडकावून लावले आहे.

“ब्रेक्‍झिट’बाबतच्य सार्वमतानंतर युरोपियन संघातील निवडणूकांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ब्रिटनने भाग घेतलेला नाही. जून महिन्यामध्ये संसदेत मांडण्यात येणाऱ्या “ब्रेक्‍झिट’च्या मसुद्याला मंजूरी देण्यात यावी. म्हणजे ब्रिटनला उन्हाळ्याच्या अखेर युरोपिय संघातून बाहेर पडता येऊ शकेल, असे आवाहन थेरेसा मे यांनी केले. “ब्रेक्‍झिट’ची संधी खूप व्यापक आहे. या संधीचा उपयोग करून घेतला नाही, तर होणाऱ्या विलंबाचे परिणाम धोकादायक होतील. प्रस्ताव नामंजूर केला तर आपल्यासमोर विभाजन आणि कोंडीचे आव्हान असणार आहे, असे थेरेसा मे म्हणाल्या.

प्रमुख विरोधी मजूर पक्षाने थेरेसा मे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोर्बिन यांनी गेल्या आठवड्यात “ब्रेक्‍झिट’बाबत खुल्या चर्चेचे आवाहन केले होते. सरकारला कोणतीही तडजोडच करायची नाही आहे, नव्याने प्रस्ताव सादर करणे म्हणजे तीनवेळेस नाकारल्या गेलेल्या प्रस्तावाची फेरबांधणी केली गेली असल्याचेही कोर्बिन यांनी म्हटले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)