मध्य प्रदेशात करोनाचा ब्रिटीश अवतार; सहा जणांना लागण

नवी दिल्ली, दि. 6- पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजधानी दिल्लीमध्ये करोनामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये तब्बल 6 जणांना ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोना विषाणूची लागण झाली आहे. एकट्या महाराष्ट्रातसुद्धा कोरोनाग्रस्तांचा आलेख वर जाताना दिसतो आहे. 5 मार्च रोजी महाराष्ट्रात तब्बल 10 हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरात करोना संसर्ग वाढत असल्यामुळे आता आणखी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दिल्लीमध्ये 591 कन्टेन्मेंट झोन
लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे राजधानी दिल्लीमध्येसुद्धा करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे सध्या 591 कन्टेन्मेंट झोन असून 1779 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये सध्या संक्रमणाचे प्रमाण 0.53 टक्के असून येथे सक्रिय करोना रुग्णांचे प्रमाण 0.27 टक्के आहे.

5 मार्च रोजी दिल्लीमध्ये 312 रुग्ण बरे झाले. पंजाबमध्येसुद्धा करोना रुग्णांची संख्या वाढत असून येथे शुक्रवारी म्हणजेच 5 मार्च रोजी 818 नवे कोरोना रुग्ण आढळले. यापैकी एकट्या जालंधर जिल्ह्यात 134 जणांना करोनाची लागण झाली आहे.

सध्या कोरोनाच्या अनेक प्रजाती जगभरात आढळत आहेत. मध्य प्रदेशातसुद्धा यूकेमधील करोनाची लागण झालेले 6 जण आढळले आहेत. इंदोर येथील एकूण 100 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 6 जणांना यूके येथील करोना स्ट्रेनशी साधर्म्य असणाऱ्या करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे सध्या येथील आरोग्य विभागाची परेशानी वाढली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.