नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा परिणाम जगभर दिसून येतो. भारत अमेरिकेसह बरेच देश या विषाणूमुळे त्रस्त झाले आहेत. कोरोना विषाणूचा प्रभाव टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे. ब्रिटीश एअरवेजने चीनशी संबंधित सर्व उड्डाणावर बंदी घातली आहे. ब्रिटीश एअरवेजने बुधवारी अशी माहिती दिली.
कंपनीने जारी केलेल्या आदेशात असे सांगितले गेले आहे की, परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार चीनशी संबंधित सर्व उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत विमान सेवा बंद राहील. आतापर्यंत चीनमध्ये या विषाणूमुळे 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, जयपूर शहरांमध्ये दिसून आले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनमध्ये अडकलेल्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.