ब्रिटनचे युवराज विल्यम पत्नी केट मिडलटनसह जाणार पाकिस्तान दौऱ्यावर

14 ऑक्‍टोबर ते 18 ऑक्‍टोबरदरम्यान पाकमध्ये चाखणार विविध पदार्थांची चव

लंडन : ब्रिटनचे युवराज विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या 14 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान त्यांचा हा नियोजित दौरा असणार आहे. आपल्या शाही दौऱ्यामध्ये पाकिस्तानमधील अनेक वेगवेगळे पदार्थ चाखून पाहण्याची इच्छा या दोघांनी व्यक्त केली आहे. काही दिवसापूर्वीच विल्यम आणि केट यांनी लंडनमधील आगा खान सेंटरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संस्कृतीबद्दल माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर पाकिस्तानी संगितकार, आचारी, कलाकारांशीही चर्चा केली.

आगा खान सेंटरला दिलेल्या या भेटीदरम्यान विल्यम आणि केट या दोघांनीही आपल्या आगामी पाकिस्तानी दौऱ्यामध्ये तेथील अनेक पदार्थांची चव घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी केट यांनी मी अनेकदा घरीच करी (आमटी) बनवते. छोटे युवराज जॉर्ज, युवराज लुईस आणि युवराज्ञी शार्लोटसाठी मी कमी तिखट तर माझ्यासाठी आणि विल्यमसाठी तिखट करी बनवते.

सर्वांसाठी वेगवेगळ्याप्रकराची करी बनवणे कठीण आहे. मुलांना कमी तिखट, विल्यमला थोडी फार तिखट तर मला खूप तिखट करी बनवणे खूपच त्रासदायक आहे, अशी माहिती दिली होती. ब्रिटनच्या राजघराण्यातील हे दांपत्य 14 ऑक्‍टोबर ते 18 ऑक्‍टोबरदरम्यान पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केट आणि विल्यम यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)