लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची पूर्वीची गर्लफ्रेंड आणि उद्योजिका जेनिफर अर्करी हिने जॉन्सन यांच्याबाबतचा गंभीर गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे जॉन्सन वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांच्यासोबत आपले शारीरिक संबंध होते, असे जेनिफरने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर तिने त्यांच्या दोघांचा एक खासगी फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये वादळ उठले असून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. जॉन्सन यांच्या सोबतचे प्रेमप्रकरण चार वर्षे सुरू होते, असेही तिने म्हटले आहे.
जेनिफर ही जॉन्सन यांच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. त्याकाळात पंतप्रधानांची पत्नी मरिना घरी नसताना आमचे संबंध आले होते. आम्ही एकाच फ्लॅटमध्ये एकत्र रहायचो. या फ्लॅटमध्ये पोल डान्सरसाठी पोलही बनवलेला होता. जेव्हा आम्ही प्रेमात आकंठ बुडालेलो होतो, तेव्हा आठवड्यातून एकदा तरी भेटायचोच, असे जेनिफरचे म्हणणे असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. बोरिस जॉन्सन यांना मी माझा टॉपलेस फोटोही पाठवला होता, असे सांगतानाच मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. ते मला खूप आवडतात, असेही तिने म्हटल्याचे वृत्त आहे.
आम्हा दोघांमध्ये शारीरिक आणि बौद्धिक आकर्षण होते. बोरिस माझे शरीर आणि बुद्धी दोन्हीवर प्रेम करायचे. त्यावेळी ते लंडनचे मेयर होते. आणि आमचे प्रेमप्रकरण 2012 ते 2016 पर्यंत सुरू होते अशी माहितीही तिने दिली असून या प्रकारामुळे ब्रिटनमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. किंबहुना जॉन्सन यांचे पद धोक्यात आले असल्याचेही मानले जाते आहे.