भारताला लस देणार असल्याचे वृत्त ब्रिटनने फेटाळले

लंडन – ब्रिटनकडून भारताला लस मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, ब्रिटनने ही चर्चा फेटाळून लावली आहे. आमच्याकडे लशीचा अतिरिक्त साठा नसल्याने भारताला लस देऊ शकत नसल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रवक्‍त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली. सध्या आमची प्राथमिकता ब्रिटीश नागरिक आहेत. त्यांच्या लसीकरणासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सध्या आमच्याकडे लशीचा अधिकचा साठा नाही. मात्र, आम्ही लशीबाबत आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, फेब्रुवारी महिन्यात आम्ही गरजू देशांना वैद्यकीय सामग्री व अत्यावश्‍यक वस्तू पाठवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, ज्या वस्तू आमच्याकडे गरजेपेक्षा अधिक असतील अशाच वस्तू, सामग्री आम्ही देणार असल्याचे स्पष्ट केले होते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.