ब्रिस्बेन : ब्रिस्बेन ओपन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानची टेनिसपटू नाओमी ओसाकाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. कॅरोलिना प्लिस्कोवाने ओसाकाचा ६-७(१०), ७-६, ६-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
.@KaPliskova shifts into overdrive to outplay Osaka 6-7(10) 7-6(3) 6-2 and book her spot in Sunday's final.
Pliskova, who served 16 aces to seal victory, will play @Madison_Keys for the title.#BrisbaneTennis #RiseUp pic.twitter.com/YYjR4qglYa
— #BrisbaneTennis (@BrisbaneTennis) January 11, 2020
या पराभवाबरोबरच ओसाकाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. याआधी ओसाकाने किकी बर्टेंसचा ६-३, ३-६, ६-३ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर कॅरोलिनाने एलिसन रिस्के हिचा ७-६, ६-३ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.
तर दुस-या उपांत्य फेरीच्या सामन्यात मॅडिसन कीजने पेट्रा क्विटोवावर ३-६, ६-२, ६-३ अशी मात करत अंतिम फेरी गाठली आहे. मॅडिसन कीजने डेनिएल कोलिंसचा ६-४, ६-१ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.