“दिग्दर्शक जेम्स गन यांना परत घ्या”

लॉस अँजेलेस: हॉलीवूड सुपरस्टार आणि गार्डियन ऑफ गॅलेक्सी या चित्रपटात सुपरहिरोची भूमिका करणारा ख्रिस पॅट आणि चित्रपटात काम करणारे त्याचे सहकलाकार यांना काढून टाकलेले या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स गन हे दिग्दर्शक म्हणून पुन्हा हवे आहेत. गन यांना त्यांच्या एका जुन्या आक्षेपार्ह ट्विटमुळे २०जून रोजी डिस्नी या चित्रपट संस्थेने काढून टाकले होते.

गन,हे गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी या  चित्रपट मालिकेतील तिसरा भाग दिग्दर्शित करणार होते. यापूर्वीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते. पॅट, जो या चित्रपटात सुपरहीरोच्या भूमिकेत आहे, त्याने इंस्टाग्रामवर एक खुले पत्र लिहून त्यांना पुन्हा दिग्दर्शक म्हणून घ्यावे अशी विनंती केली आहे. या पत्रावर त्याने त्या चित्रपटात काम कारण्याऱ्या अन्य कलाकारांच्या देखील स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संबंधित बातमी : ‘गार्डीयन्स ऑफ गॅलक्सी’ हॉलीवूडपटाच्या दिग्दर्शकास दाखवला घरचा रस्ता

“मी गन यांच्या कृतीचे समर्थन करीत नाही परंतु ते चांगले गृहस्थ आहेत. मला स्वतःला ते दिग्दर्शक म्हणून पुन्हा आले तर खूप आनंद होईल.” असे तो पुढे म्हणाला.

गन यांनी काही वर्षांपूर्वी बलात्कार आणि बालशोषण यावर ट्विट केले होते. त्यानंतर काही संकेतस्थळांनी ते ट्विट पुन्हा समोर आणले त्यामुळे गन यांना काढून टाकण्यात आले होते. गन आणि त्यांच्या चित्रपटांच्या चाहत्यांनी change.org या संकेतस्थळावर जाऊन त्यांना पुन्हा घेण्यासाठी याचिका दाखल केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)