कोल्हापूर(प्रतिनिधी) : विवाहाची नोंदणी करून दाखला देण्याकरता हातकणंगले ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाने तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना त्याच्या साथीदारास लाच लुचपत प्रतिबंधकच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
तर या प्रकरणी आणखीन दोघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
खासगी साथीदार सौरभ अरविंद नर्ले (वय-24, रा.मु पो नेज, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे या लाच स्विकारताना अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर सुधीर अमितचंद चौधरी, (45, कनिष्ठ लिपिक, हातकणंगले ग्रामीण रुग्णालय वर्ग-3) त्याचा खासगी साथीदार सचिन शिवाजी भोसले (रा. नेज, ता.हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.