अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रायन लारा रुग्णालयात

मुंबई – अस्वस्थ वाटू लागल्यामुळे वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ क्रिकेटपटू ब्रायन लारा यांना मंगळवारी मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल.

लारा हे येथे विश्‍वचषकाचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या अधिकृत वाहिनीदसाठी तद्य म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतेच अधिकृत निवेदन प्रसारित करण्यात आलेले नाही. मात्र, या वाहिनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, लारा यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या अस्वस्थपणाचे नेमके निदान रुग्णालयाकडून कळलेले नाही. तथापि त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत व लवकरच ते कामावर रूजे होऊ शकतील असे वैद्यकीय तद्यांकडून कळविण्यात आले आहे.

लारा यांनी 131 कसोटींमध्ये 52.89 च्या सरासरीने 11 हजार 953 धावा केल्या आहेत. या डावखुऱ्या खेळाडूने 2004 मध्ये इंग्लंडविरूद्धच्या कसोटीत एकाच डावात 400 धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये नाबाद 501 धावा करीत विश्‍वविक्रम केला आहे. 1994 मध्ये वार्विकशायरकडून खेळताना त्यांनी दरहॅमविरूद्ध ही कामगिरी केली होती. त्यांनी एक दिवसाच्या 299 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भाग घेत 10 हजार 405 धावा केल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)