मस्कत -लेजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत इंडिया महाराजा संघाला वर्ल्ड जायंट्स संघाकडून खेळत असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्या गोलंदाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागला.
वर्ल्ड जायंटने हर्षल गिब्जच्या 46 चेंडूतील 89 धावांच्या जोरावर 5 बाद 228 धावा केल्या. इंडिया महाराजाने चांगली सुरुवात केली होती. नमन ओझाने 51 चेंडूत 95 धावांची अफलातून खेळी केली.
इरफान पठाणनेही अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाची आशा दाखवली. मात्र, अखेरच्या षटकात आवश्यक 8 धावा ब्रेट ली याच्या अचूकतेसमोर करता आल्या नाहीत व इंडिया महाराजा संघाला 5 धावांनी सामना गमवावा लागला.