पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणात आता स्तनदा माता, दिव्यांग नागरिक यांना प्राधान्य देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी शुक्रवारी लस राखीव ठेवण्यात येणार आहे. 94 केंद्रांवर “कोविशिल्ड’ लस दिली जाणार असून, त्यासाठीचा कोटाही ठरवण्यात आला आहे. याशिवाय “कोवॅक्सिन’ लसीचा दुसरा डोसही दिला जाणार असून, तो 15 केंद्रांवर दिला जाणार आहे.
94 केंद्रांवर प्रत्येकी 100 लस उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यातील 60 टक्के ऑनलाइन बुकिंग करून अपॉइंटमेंट घेतलेल्या नागरिकांना मिळणार आहे. याशिवाय, 4 मार्चपूर्वी म्हणजे 84 दिवस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जाणार आहे.
उर्वरित लस ही दिव्यांग नागरिक, स्तनदा माता, हेल्थ केअर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 45 वर्षे वयापुढील केंद्रावर उपस्थित असलेल्या नागरिकांना “ऑन दि स्पॉट’ बुकिंग करून दिली जाणार आहे. यासाठी सकाळी आठ वाजता बुकिंग करावे लागणार आहे