स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता

डॉ. प्रतीक्षा यादव 

स्तनाचा कर्करोग हा एक असा रोग आहे की, ज्यामध्ये पेशींची अनियंत्रित वाढ होते. स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा कर्करोग आहे आणि मृत्यूचं तिसरे सर्वात मोठे कारण म्हणून ओळखला जातो. स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण शहरी व निमशहरी भागातील स्त्रियांमध्ये सर्वात अधिक आहे त्यातुलनेत ग्रामीण भागात त्याचे प्रमाण कमी आढळून येते. दुर्दैवाने भारतात ह्या कर्करोगाचे प्रमाण तीस व चाळिशीच्या तरुणींमध्ये जास्त दिसून येत आहे. अनुवांशिकता, उशिराने होणारी गर्भधारणा किंवा वंध्यत्व, लठ्ठपणा, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी या कारणामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

स्तनावर गाठ येणे. स्तनावरील सूज
त्वचेवरील जळजळ होणे.
स्तनाग्र (निपल) आकुंचन पावणे.
स्तनाग्र लाल होणे आणि जाड होणे.
स्तनाग्रातून स्राव वाहणे.

लवकरात लवकर निदान करून जीवन वाचवणे हे फारच महत्त्वाचे आहे. स्तन कर्करोगाविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. सामाजिक दबावामुळे महिला आपला आजार लपवून ठेवतात तसेच महिलांमधील लाजाळूवृत्तीमुळे देखील लक्षणे उशिराने समजली जातात आणि मृत्युदर वाढतो. या रोगाचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास उपचाराअंती कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. कर्करोग प्रतिबंधात्मक तपासणीमुळे मृत्युदराचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले आहे.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी केली जाते. मॅमोग्राम स्तनाचा कर्करोग रोखू शकत नाही परंतु प्रारंभिक टप्प्यात कर्करोगाचे निदान करण्यासाठीची ही सर्वोत्तम तपासणी आहे. पहिल्या टप्प्यात निदान होणे ही सर्वोत्तम उपचाराची गुरुकिल्ली म्हणावी लागेल परंतु दुर्दैवाने निदान झालेले रुग्ण हे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील असतात. कर्करोग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक तपासणी करून घेणे फार महत्त्वाचे आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्तनांच्या कर्करोगाचे निदान करणे फार सोपे झाले आहे. प्रारंभिक टप्प्यात स्तन कर्करोगाचे निदान करण्यासाठी एमआरआय हे सुध्दा एक अतिशय महत्त्वाचे साधन आहे. विविध रुग्णालयांत स्तनाच्या कर्करोगाची प्रतिबंधात्मक तपासणी विशेष तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून करण्यात येते. सर्व अत्याधुनिक साधने व तपासण्या उपलब्ध असतात. यामध्ये डिजिटल मॅमोग्राफी मशीनसह टोमॉसिंथिसिस, अल्ट्रासाउंड ब्रेस्ट, स्तन एमआरआय त्याचबरोबर कर्करोगावरील उपचार केले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)