अभिनेता अमित साध याची चित्रपटातील कारकीर्द जितकी यशस्वी झाली तितके त्याचे लव लाईफ सक्सेसफुल झाले नाही. सुरुवातीला नीरु बाजवा या पंजाबी अभिनेत्रीसोबत त्याचे ब्रेक अप झाले. त्यानंतर ब्राझीलची सुप्रसिद्ध फिटनेस मॉडेल एनाबेल दासिल्वासोबतच्या रिलेशनशिपमुळे त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची सोनेरी किरणे पडली.
अमित आणि एनाबेल एका जिममध्ये भेटले होते. त्यावेळी अमित एका असाईनमेंटवर काम करत होता, तर एनाबेल एका बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या तयारीसाठी व्यस्त होती. साधारण एक वर्षापूर्वी अमित आणि एनाबेलने आपल्या नात्यावर जाहीरपणाने शिक्कामोर्तब केले. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात काही धुसफूस सुरू असल्याची चर्चा होत होती.
इतकेच नव्हे तर त्यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. पण या अफवा नसून वास्तव असल्याचे समोर आले आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अमितने यावर शिक्कामोर्तब केले आहे. “मी आता सिंगल असून एखाद्याचा जोडीदार होण्यासाठी तयार आहे’ असे अमितने सांगितले आहे.
हा ब्रेकअप दोघांच्या सहमतीने झाल्याचे सांगितले जाते. या दोघांनीही एकमेकांशी असणारी मैत्रीसंबंध कायम ठेवण्याचे ठरवले आहे; पण जीवनसाथी म्हणून पुढे जाता येणार नाही, यावर दोघांचेही एकमत झाले आहे.