नियमांना बगल देणे वाईन शॉपना महागात

पुणे – दारू विक्रीसाठी परवानगी देताना दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे शहरातील दारूच्या नऊ दुकानांवर मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता वाईन शॉप चालकांना मद्याची विक्री करताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेले एक दुकान विश्रामबाग, दोन चंदननगर, चार चतु:शृंगी आणि हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात दुकाने आहेत. दारूची विक्री करण्यासाठी परवानगी देताना सोशल डिस्टंन्सिग पाळणे, मास्क घालणे आदी नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. मात्र, दुकान मालकांनी नियम आणि अटींचा भंग केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता “रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातही मद्यविक्रीला चार मेपासून सशर्त परवानगी मिळाली होती.

महिनाभरानंतर दुकाने उघडणार असल्याने राज्यभरातील वाईन शॉपवर तळीरामांनी सकाळपासून गर्दी केली होती. त्यामुळे दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. दारू खरेदीसाठी रांगा आणि गोंधळ वाढल्याने पोलिसांनी काही ठिकाणी वाईन शॉप बंद केले होते. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी सर्व वाईन शॉप मालकांना नोटीस देऊन करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व खबरदारी पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही दारू दुकानासमोर गर्दी झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.