संगमेश्वर | Narayan Rane arrested : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्याविरोधातील वक्तव्य केल्या प्रकरणी अखेर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना भोवले आहे. राणे यांना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.
राणे यांना नाशिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ( Narayan Rane arrested )
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य ( Narayan Rane arrest over his remarks on CM Uddhav Thackeray ) केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणेंच्या घरी पोहोचले.