मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक पावित्रा घेतला होता. राठोड याच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीची पहिली विकेट पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजप नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुनावलं होतं. तर भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा विधानसभेचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समजते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारीच माध्यमांशी बोलताना राठोड यांच्या राजीनाम्याबद्दलचे संकेत दिले होते. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते लक्षपूर्वकपणे यावर निर्णय घेतील,’ असं सूचक विधान राऊत यांनी केलं होतं. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवल्यानं शिवसेनेनं राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं