Chhagan Bhujbal । Ajit Pawar group । राज्यात काही दिवसानंतर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. मात्र या सामान्यसाठी कोणत्याही पक्षाकडून जागावाटप करण्यात आले नाही.
दरम्यान, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील अजित पवार गटाकडून त्यांच्या जागा फिक्स केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवार यांनी दावा केला होता. मात्र, अश्यातच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी जागावाटपावर सविस्तरपणे भाष्य केले आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “आमच्याकडे 60 जागा आता आहे. त्यावर निदान 20 ते 25 जागा मिळाव्यात अशी आमची धारणा आहे. दादा कधीच 60 जागा द्या म्हणाले नाही.
दादा म्हणाले, आमच्याकडे 60 जागा आहेत. त्यावर अधिक जागा द्या, असं त्यांचं म्हणणं आहे”, असे छगन भुजबळांनी म्हटले. यामुळे आता अजित पवार गटाला 60 पेक्षा जास्त जागा हव्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर छगन भुजबळ म्हणतात की…..
यावेळी बोलताना ते म्हणाले, “ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं काही महाविकास आघाडीत काही ठरलं असं मला नाही वाटत. काल पहिल्यांदा पवार असं म्हणाले. त्या आधी ते निवडणुकीपूर्वी ठरवू असं म्हणाले.
पण महाविकास आघाडीच्या काही नेत्यांचा वेगळा आग्रह आहे. इकडेही तसं आहे. सर्व म्हणतात पहिल्यांदा निवडणूक लढवूया. दोन्हीकडे सेम आहे. असे छगन भुजबळ म्हटले.
हे देखील नक्की वाचा…